उल्हासनगर महानगरपालिका file photo
ठाणे

ठाणे : उल्हासनगर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला कनिष्ठ लिपिकाने अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला कर्मचार्‍याने तक्रार केली आहे की, 2022 ते 2023 या कालावधीत जमीर लेंगरेकर यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये तिच्या सोबत वारंवार अश्लील शब्दांत संभाषण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

फिर्यादी यांचे पती हे उल्हासनगर महानगरपालिकेत ड्रायव्हर म्हणून कर्तव्य करीत होते. 2010 मध्ये पतीचे निधन झाल्याने त्यांचे जागेवर 2011 मध्ये फिर्यादी ह्या कनिष्ठ लिपिक या पदावर अनुकंपा तत्वावर भरती झाल्या. 2011 पासून 2019 पर्यंत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामास होत्या. 2019 मध्ये त्या कायमस्वरूपी कामाला लागल्या. 2017 मध्ये फिर्यादी ह्या निवडणूक विभागात काम करत असताना विभागाचे उपआयुक्त म्हणून लेंगरेकर यांचेशी कामादरम्यान ओळख झाली. त्यादरम्यान दोघांमध्ये वारंवार बोलणे होत होते. त्या कालावधीत लेंगरेकर यांची 6 महिन्यानंतर पनवेल महानगरपालिका या ठिकाणी बदली झाली. फेब्रुवारी 2022 मध्ये जमिर लेंगरेकर हे अतिरिक्त आयुक्त ह्या पदावर उल्हासनगर महानगरपालिकेत रुजू झाले. त्यावेळी फिर्यादी ह्या मालमत्ता विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होत्या. त्यावेळी लेंगरेकर हे विभागाचे प्रमुख होते. कामासंबंधी फाईल घेवून लेंगरेकर हे फिर्यादीला केबिनमध्ये बोलावून अवांतर असे काहीही बोलायचे. त्यामुळे अखेर महिलेने त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT