पालघर : उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक पालघर आणि डहाणू निरीक्षक कार्यालयाने संयुक्त रित्या मोखाडा तालुक्यातील निळमाती भागात जव्हार नाशिक रस्त्यावर केलेल्या कारवाईत दमण बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा टेम्पो जप्त करण्यात आला आहे. रविवारी (दि.4) केलेल्या कारवाईत टेम्पो सह 13 लाख 83 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टेम्पो चालक प्रवीण पाटील (वय.32) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दारूबंदी अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रशासित प्रदेशातील मद्याची महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या अवैध वाहतुकीविरोधात कारवाईसाठी केंद्र शासित प्रदेशाच्या सीमा भागात उत्पादन शुल्क विभागा मार्फत गस्त घातलली जात आहे. रविवारी उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक आणि डहाणू कार्यालयाच्या संयुक्त पथकाने मोखाडा तालुक्यातील निळमाती गावच्या हद्दीत जव्हार-नाशिक रस्त्यावर सापळा रचला होता. यावेळी एका संशयित पिकअप टेम्पो थांबवून टेम्पोची तपासणी केली असता टेम्पो मध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला दमण बनावटीचा विदेशी मद्य व बिअरचा साठा आढळून आला. वाहन आणि मुद्देमाल जप्त करून करण्यात आला. टॅम्पोचालक व त्याचा साथीदार मिळून दोन आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे पालघर जिल्हा अधीक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक, बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे निरीक्षक अरुणकुमार चव्हाण आणि डहाणू विभागाचे निरीक्षक एस एस देशमूख यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक उदय शिंदे, पांडुरंग पडवळ, जवान अमोल नलावडे, योगेश हरपाळे, महेंद्र पाडवी आणि अनिल पाटील यांच्या पथकाने केली