ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाण्यातील कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीची गर्दी झाली असून त्यांचे लोंढेच्या लोंढे रस्त्याने दिसत आहेत.
शनिवार (दि.5) दुपारी एक वाजल्यापासून महिलांनी कार्यक्रम स्थळ गाठण्यास सुरुवात केली आहे. सायंकाळी चार वाजता पंतप्रधान मोदी हे सभेस्थळी पोचतील. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. भरगच्च शासकीय कार्यक्रमाला दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांचे नुकतेच आगमन झाले आहे. उपस्थित महिला, जनसमूह यांच्यासाठी देशभक्ती पर गाण्यांचा बहारदार कार्यक्रम साजरा होत आहे. कार्यकर्त्यांनी भगवे फेटे परिधान केले आहेत.