ठाणे

ठाणे : जितेंद्र आव्हाडांचा बालेकिल्ला ताब्यात घेण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अप्रत्यक्ष इशारा

backup backup

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह चार नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशासाठी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. अभी तो ये झाकी है, अगला स्टेशन बाकी है असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्लाच ताब्यात घेण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

मुंब्रा विकास आघाडी स्थापन करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आव्हाड यांना आव्हान दिले आहे.या नगरसेवकांना शिंदे गटाचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.रविवारीही आव्हाडांच्या मतदार संघात विकास कामांचे उदघाटन करण्यात आले असून यात आव्हाडांचा फोटो गायब होता.राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्या पक्ष प्रवेशातही ट्विटरचे असणारे क्लास नेते असले तरी जगदाळे मास नेते असल्याची टीका त्यांनी यावेळी केली तर जगदाळे यांच्या प्रवेशानंतर ये तो अभि झाकी है, अगला स्टेशन बाकी असल्याचे सांगत त्यांनी आव्हाडांचा बालेकिल्ला काबीज करण्याचे जाहीर केले आहे.

SCROLL FOR NEXT