तक्षक रमेश पाटील व मृण्मयी रमेश पाटील या सख्ख्या भावंडांनी आंतरराष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत चमदार कामगिरी केली. pudhari news network
ठाणे

ठाणे : आंतरराष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत पिंपळास गावचे भावंडाची चमकदार कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी तालुक्याचे नाव सातासमुद्र पार पोहचवणारे पिंपळास गावचे सुपुत्र कुमार तक्षक रमेश पाटील व मृण्मयी रमेश पाटील या सख्ख्या भावंडांनी थायलंड येथे 13 देश मिळून पार पडलेल्या स्केटिंग रेस स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली.

पिंपळास गावचे भावंडांच्या चमकदार कामगिरीने संपूर्ण भिवंडी वासियांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे दोघा भाऊ बहीण यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी युवा सेना ठाणे जिल्हा सरचिटणीस राजु भाऊ चौधरी, रमेश पाटील, उपतालुका प्रमुख मोहन गायकवाड, विलास पाटील उपास्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT