Thane Borivali Tunnel Project Pudhari Photo
ठाणे

Thane Borivali Tunnel Project: येत्या दोन वर्षांत १५ मिनिटांत ठाणे-बोरिवली: मुख्यमंत्री फडणवीस

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे खोदकाम सुरू

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून देशातीलसर्वात खोलवर आणि सर्वात मोठ्या व्यासाचा ठाणेते बोरिवली हा दुहेरी बोगदा येत्या दोन वर्षात पूर्णहोईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. मे २०२८ पर्यंत पूर्ण होऊन ठाणे - बोरिवली हे ९० मिनिटांचे अंतर अवघ्या १५ मिनिटांत कापता येईल आणि आर्थिक विकासालागती मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सुमारे १६ हजार ६०० कोटी खर्चुन हा ठाणे-बोरिवली सहा पदरी रस्ता उभारला जात आहे. प्रकल्प एमएसआरडीसीकडून मुंबई महानगर प्रदेशविकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) वर्गझाल्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीसुनेत्रा पवार यांच्या हस्ते टीबीएम मशिन्सचे बटणदाबून बोगद्याच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे,महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णापाटील, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जीआदी मान्यवर उपस्थित होते.

या दुहेरी बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन २०२४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.आता या बोगद्याची रचना पूर्णपणे जमिनीखालीअसल्याने जैवविविधतेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नसून सुमारे ११,००० झाडे लावली जाणार आहेत.

पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांखाली दुहेरी-नळीच्या भूमिगत मार्गाच्या स्वरूपात बांधले जात असून बोगद्याची डिझाइन ही सहा-पदरी (३+३ पदरी) अशी केलेली आहे. तसेच बोगद्यात ३०० मीटरवर क्रॉस पॅसेज ठेवण्यात आलेले आहेत. या बोगद्याचे काम लवकर पूर्ण करून ठाणे आणि मुंबईकरांना मोठी भेट द्या, असे मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना बजावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT