पनवेल : विक्रम बाबर
नवीमुंबई पोलिसांकडून बांगलादेशीयाची धरपकड सुरू झाली आहे. बुधवारी (दि.25) कामोठे पोलिसांनी दोन बांगलादेशियावर कारवाई करून दोघांना अटक केली आहे. हे दोन बांगलादेशी गेल्या एक वर्षा पासून खांदा कॉलनी से.17 येथे वास्तव्यासाठी आहे.
विशेष म्हणजे भारतात राहून बांगलादेशी येथील नातेवाईकांच्या ते दररोज संपर्कात असल्याची बाब समोर आली आहे. आणि या संपर्कासाठी ते 'इमो' ॲप्लिकेशनचा वापर करत होते. या अॅप्लिकेशन वरून ते थेट व्हिडीओ कॉलिग करत होते. सद्या हे दोन्ही बांगलादेशी कामोठे पोलिसांच्या ताब्यात आहे.
इमरान कददुस उल्ला वय 45 राहणार खांदा कॉलनी सेक्टर 12, आणि मिनी इम्रान मुल्ला वय 35 राहणार खांदा कॉलनी सेक्टर 12 असे पकडलेल्या दोन बांगलादेशीयांची नावे आहेत. कामोठे पोलिसांनी कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले आहे. कामोठे पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका खरटमल यांना गुप्तबातमीदार मिळालेल्या माहितीनुसार कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठा खांदा गाव येथे दोन ते तीन बांगलादेशी वास्तव्यात आहे अशी माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका खरटमल यांनी अन्य पोलिस कर्मचार्याच्या मदतीने मोठा खांदा गाव सेक्टर 17 येथे राहत असलेल्या घरात धाड मारून दोघांची विचारपूस सुरू केली.
भारतीय नागरिक असल्यास रहिवाशी पुरावा आहे का ? या बाबत पोलिसांनी विचारणा केल्यानंतर त्यांनी नकार दिला आणि त्याची अधिकची चौकशी आणि तपासणी केली असता धक्कादायक वास्तव पोलिसांच्या समोर आले, या दोन्ही बांगलादेशी याच्या मोबाईल फोन वर बांगलादेशी कॉलीग कंट्री कोड ( + 8801 ) ने सुरू होणारे खूप सारे कॉल दिसून आले.