उल्हासनगर युनिट ४ ने चोरीचा छडा लावला असून, दोन आरोपींना अटक केली Pudahri
ठाणे

Badlapur Robbery | बदलापुरात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक: ८.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Ulhasnagar Crime Branch

उल्हासनगर : बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिट ४ ने छडा लावला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण सुमारे ८ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे हवालदार राजेंद्र थोरवे यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी आंबेशिव-दहागाव रोड वरील गावदेवी मंदिर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस अंमलदार राजेंद्र थोरवे, गणेश गावडे, अशोक थोरवे, अमर कदम, विक्रम जाधव, संजय शेरमाळे आणि अविनाश पवार यांच्या पोलीस पथकाने सापळा रचला.

यावेळी पोलिसांनी शिताफीने सनी ऊर्फ मॅक्स बाळू रोकडे (२२, रा. सांबारी गाव, अंबरनाथ) आणि चिराग दीपक राऊत (२३, रा. मांजर्ली गाव, बदलापूर पश्चिम) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून ४० हजार रुपयांचा मोबाईल, २८ हजार रुपयांचा मोबाईल आणि १ हजार रुपयांचा कार टेप, तसेच गुन्ह्यात वापरलेली ७ लाख ५० हजार रुपये किमतीची कार जप्त केली आहे.

या प्रकरणातील कृष्णा गौड (रा. बदलापूर पूर्व) हा आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या सनी ऊर्फ मॅक्स रोकडे याच्यावर यापूर्वी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात जबरी चोरीसह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT