कल्याण पत्रीपूल परिसरात अजस्त्र बॉयलर वाहून नेणारा पुलर उलटल्याची घटना घडली pudhari news network
ठाणे

ठाणे : कल्याण पत्रीपूल परिसरात अजस्त्र बॉयलर कंटेनर उलटला

बॉयलर कंटेनर उलटला; परिसरात मोठी वाहतूक कोंडी

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : कल्याण पत्रीपूल परिसरात अजस्त्र बॉयलर वाहून नेणारा पुलर उलटल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ एमआयडीसीतून नाशिककडे जाताना या अजस्त्र बॉयलरचा पुलर उलटून अपघात झाला. रविवारी (दि.29) रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिममेकडे येणार्‍या मार्गावर हा अपघात झाला. त्यामुळे पत्री पुलाच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

अंबरनाथ येथून ओडिसाला जाण्यासाठी हा अजस्त्र बॉयलर निघाला होता. त्याचवेळी कल्याणच्या पत्रीपुलावरून दुर्गाडीकडे जात असताना त्या चौकातच हा पुलर उलटला. मात्र सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने रस्त्यांवर फारशी वर्दळ आणि वाहतूक नव्हती. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

दरम्यान या उलटलेल्या पुलरमुळे पत्रीपुलावरील कल्याणकडे येणार्‍या बाजूची वाहतूक प्रभावित झाली आहे. तर क्रेनच्या साहाय्याने हा उलटलेला पूलर बाजूला करण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करत होते. सकाळी साडे आठनंतर हा पुलर बाजूला करण्यात यश आले. परंतु या मार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला होता. दरम्यान चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा उलटलेला पुलर उचलण्यात आणि अजस्त्र बॉयलर बाजूला काढण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे रखडलेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येऊ शकली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT