ठाणे

ठाणे : अल्पवयीन गरोदर माता, बालक मृत्यू प्रकरणी प्रशासन ॲक्शनमोडवर

पुढारी वृत्तसेवा

मोखाडा : तालुका हा नेहमीच एक ना एक घटनेने चर्चेत असतो. येथील एका अल्पवयीन गरोदर माता व बालमृत्यूमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या घटनेने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मोखाडा तालुक्यातील एका अल्पवयीन गरोदर माता आणि अर्भकाच्या मृत्यू ला कारणीभूत असलेल्या सर्वांवरच कारवाई झाली असून मुळात यासाठी मंडपवाला आणि आचारी यांच्यावरही कारवाई झाल्याने आता सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.

मोखाडा तालुक्यातील मोहांडा येथील पाच महिन्यांच्या अल्पवयीन गरोदर माता मंगला जयेश निसाळ (वय १६) वर्ष हिच्या छातीत व पोटात दुखू लागल्याने तिला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान तिच्यासह पाच महिन्यांच्या अभर्काचा देखील मृत्यू झाला ही घटना ८ तारखेला घडली मात्र तेंव्हा प्रथमदर्शीनी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती परंतु तपासाअंती २२ तारखेला तिचा पती जयेश रामदास निसाळ (२१) ह्याच्या वर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मृत मंगलाचे सासू-सासरे, आई वडील, चुलते तसेच मंडपवाला, लग्न लावणारे भटजी, जेवण बनवणारे आचारी यांच्यावर देखील बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी मुंबईपासून १०० किमी अंतरावर, वसलेला मोखाडा तालुका स्वातंत्र्याची ७५ वर्ष ओलांडली असतानाही येथील समस्या सुटलेल्या नाहीत ही शोकांतिका आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT