Thane Crime News Pudhari
ठाणे

Thane Crime News: ठाण्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; वेब सिरीजमधील अभिनेत्रीस अटक

वागळे इस्टेटमधील हॉटेलमध्ये पोलिसांचा सापळा; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाण्यात एका हॉटेलमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एजंट महिलेस ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारच्या सुमारास अटक केली.

अटकेतील महिला सिनेमा व वेब सिरीजमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील पडवळ नगर भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये एक महिला काही तरुणींना शरीर विक्रयासाठी आणणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजली आंधळे यांच्या पथकाने २६ सप्टेंबर रोजी सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून सापळा लावला. यावेळी एक महिला असहाय्य तरुणींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून व्यवसाय करवून घेत असल्याचे समोर आले. त्यानंतर सदर एजंट महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी तिच्या तावडीतून दोन तरुणींची सुटका करण्यात आली. या एजंट महिलेविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुटका करण्यात आलेल्या दोघा तरुणींना सुरक्षागृहात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, अटक करण्यात आलेली महिला ही हिंदी सिनेमा व वेब सिरीजमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री असून पंधरापेक्षा अधिक वेब सिरीजमध्ये काम केले आहे, असे पोलीस तपासातून समोर आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पथक करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT