वेदांती म्हात्रे या जलतरणपटूने अवघ्या 4 तासांत 12 किमी सागरी अंतर कुठेही न अडखळता पोहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अनोखे अभिवादन केले. Pudhari News network
ठाणे

ठाणे : जलतरणपटू वेदांती म्हात्रे हिचे महापरिनिर्वाण दिनी अनोखे अभिवादन

4 तासांत 12 किमी सागरी अंतर फत्ते; जलतरणपटू वेदांती म्हात्रेवर कौतुकाचा वर्षाव

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याणच्या सह्याद्री लोकधारा परिसरात राहणाऱ्या 12 वर्षीय वेदांती म्हात्रे या जलतरणपटूने अवघ्या 4 तासांत 12 किमी सागरी अंतर कुठेही न अडखळता पोहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अनोखे अभिवादन केले. धाडसी वेदांतीवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वेदांती म्हात्रे ही सद्या लोककल्याण पब्लिक स्कूलमध्ये सातव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. अथांग सागर उसळणाऱ्या लाटांच्या भरती आणि ओहोटीच्या बदलत्या वेळा अशा कोणत्याही समस्येची पर्वा न करता वेदांतीने विशाल अरबी समुद्रात उडी घेतली. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अरबी समुद्राला आव्हान देत एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे 12 किमीचे अंतर अवघ्या 4 तासांत पार केले.

शुक्रवारी (दि.7) सकाळी 5 वाजता अंगाला ग्रीस लावून महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या देखरेखखाली एलिफंटा जेटी येथून वेदांतीने आपल्या लक्षाच्या दिशेने पोहोण्यास सुरूवात केली. सकाळचा थंडगार वारा, अंधार, बोचऱ्या थंडीचे वातावरण होते. नंतर जसजसे आत समुद्रात जात होती तसे समुद्रात घाण, कचरा, तेलाचा तवंग पाण्यावरून वाहत होता. समुद्रातील वाढत्या प्रदूषणाचा फटका वेदांतीला बसला. गेटवे पासूनचे 4 किमी अंतर असताना समुद्रातील मोठ्या जहाजांच्या हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या लाटांचे तडाखे वेदांतीला बसत होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करत अखेर वेदांतीने सकाळी 9 वाजून 8 मिनिटात गेटवेवर पाय ठेवला. गेटवेवर आल्यानंतर वेदांतीचे जंगी स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्वांनी तिचे कौतुक आणि अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

वेदांतीला डोंबिवलीतील यश जिमखान्यातील तरण तलावाचे प्रशिक्षक विलास माने आणि रवि नवले यांच्याकडून पोहोण्याचे धडे गिरवायला मिळाले. दर रविवारी उरण येथे समुद्रात संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करायची. वेदांतीचे पुढील लक्ष्य धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय इंग्लिश खाडी पोहून पार करायचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT