ठाणे

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर पडले झाड

निलेश पोतदार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

ठाणे जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बंगल्यासमोरही दुपारी झाड कोसळले. त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांची वाहने उभी आहेत.

सोमवारपासून ठाण्यासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहेत. धो-धो कोसळणाऱ्या पावसात मंगळवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शिंदे हे ठाण्यातील लुईसवाडी येथील घरी गेले. त्याठिकाणी पत्नी, सून आणि नातवाने त्यांचे स्वागत केले. सकाळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेऊन सतर्क राहण्याचा आदेश यंत्रणांना दिला.

रात्रीपासून ठाण्यात २३ झाडे कोसळली. दुपारी मुख्यमंत्री बंगल्यासमोर एक झाड दुपारी उन्मळून पडले. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची वाहने उभी होती. सुदैवाने वाहनांचे नुकसान झाले नाही. घटनास्थळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त हेरवडे आणि आपत्कालीन यंत्रणेचे कर्मचारी पोहचले आणि पडलेले झाड बाजूला केले.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT