क्रीडा संकुल  file photo
ठाणे

ठाणे : पालघर जिल्ह्यात कामगार रुग्णालयासह भव्य क्रीडा संकुल उभे राहणार

पुढारी वृत्तसेवा
खोडाळा : दीपक गायकवाड

केंद्रीय कामगार व रोजगार तथा क्रीडा मंत्री मनसुख मंडविया यांनी पालघर जिल्ह्यासाठी ईएसआयसी (कामगार) रुग्णालयाला तत्वतः मान्यता दिली असून क्रीडा संकुलासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पालघर लोकसभेचे खासदार डॉ हेमंत विष्णू सवरा यांनी केंद्रीय कामगार व रोजगार तथा क्रीडा मंत्री मांडविय यांची दिल्ली येथे व्यक्तिशः भेट घेऊन प्रस्तुत मागण्या नोंदवत सांगोपांग चर्चा केली होती. केंद्रीय मंत्र्यांनी त्यावर सकारात्मक भुमिका घेत या दोन्ही मागण्या तत्वतः मंजूर केलेल्या आहेत. त्यामूळे जिल्ह्यातील कामगारांना अद्ययावत आरोग्य सुविधा तर सुप्त क्रीडा पटूंना हक्काचे व्यासपीठ लवकरच उभे राहणार आहे.

खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी दिल्लीत केंद्रीय कामगार व रोजगार तथा क्रीडा मंत्री मनसुख मंडविया यांची व्यक्तिशः भेट घेऊन पालघर लोकसभा क्षेत्रातील वस्तूनिष्ठ समस्या विशद केल्या आहेत.यात कामगारांसाठी अद्ययावत रुग्णालय तसेच प्रामुख्याने होतकरू आदिवासी क्रीडापटूंच्या उपजत आणि अंगभूत कलागुणांना वाव मिळवून मिळवून देण्यासाठी भव्य क्रीडा संकुलाची मागणी केली असून या दोन्ही मागण्यांवर सांगोपांग आणि सकारात्मक चर्चे अंती मंत्री महोदयांनी क्रीडा संकुलासाठी 5 कोटी निधी तर इएसआयसी अर्थात कामगार रुग्णालयाला तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामूळे आदिवासी तरुणांना आपले उपजत कलागुणांना चालना देता येणार असून कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याचा मुलभूत प्रश्न प्राधान्यक्रमाने सुटणार आहेत.

पालघर लोकसभा क्षेत्रात हजारो उद्योग धंदे आणि त्या माध्यमातून लाखो कामगार आहेत. परंतू पुरेशी आणि अद्ययावत आरोग्य सुविधा नसल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचा आरोग्याचा प्रश्न जटील बनला होता. प्रस्तूत रुग्णालयासाठी कुंभवली येथे भुखंड उपलब्ध केला आहे. तसेच क्रीडा संकूलाच्या माध्यमातून आदिवासी तरुणांना आपले कलागुण जोपासने सोयीचे होणार असल्याने केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांचे शतशः धन्यवाद..!
डॉ. हेमंत विष्णू सवरा, खासदार, पालघर लोकसभा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT