ठाणे

ठाणे : मुरबाडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८२ टक्के मतदान

दिनेश चोरगे

मुरबाड; पुढारी वृत्तसेवा : मुरबाड तालुक्यात थेट सरपंचपदासह १९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४९ मतदान केंद्रावर १३ हजार ६०६ मतदारांनी आज (दि.५) मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या.

दुपारी बारा वाजेपर्यंत ४२.७१ % मतदान झाले. ३.३० वाजेपर्यंत पुरूष ५३०७ , तर स्त्री ५१३० मतदारांनी मतदान केले. असे एकूण ७६.७१ % टक्के मतदान झाले. संध्याकाळी मतदान प्रक्रिया संपली तेव्हा ८२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले आहे. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
प्रसाद पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरबाड पोलीस ठाणे

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT