पंचवार्षिक कार्य अहवाल प्रकाशन सोहळा प्रसंगी उपस्थित कल्याण पश्चिम विधानसभेचे शिंदे गटाच्या आमदार (छाया : सतिश तांबे)
ठाणे

Thane | आचार संहितेच्या लगबगीने 'त्यांनी' उरकला पंचवार्षिक कार्य अहवाल प्रकाशन सोहळा

कल्याण पश्चिम विधानसभेचे शिंदे गटाच्या आमदारांनी उरकला पंचवार्षिक कार्य अहवाल प्रकाशन सोहळा....

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आचार संहितेची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग मंगळवारी (दि.15) दुपारी करणार असल्याचे जाहीर केल्याने राज्यातील अनेक विद्यमान विधान सभेच्या आमदारांनी आपला कार्य अहवाल प्रसिद्ध करण्याची लगबग सुरू केली.

कल्याण पश्चिम विधान सभा मतदार संघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी ही आचार संहितेची घोषणा जाहीर होण्या पूर्वी काही तासाचा अवधी उरला असतानाच आपल्या आमदार पदाच्या कार्यकाळातील विकासकामांचा पंचवार्षिक कार्य अहवाल घाईगडबडीत प्रकाशित केला.

महाराष्ट्र राज्याच्या विधान सभेच्या निवडणुकीची आचार संहितेची प्रतीक्षा लागून राहिली होती.अखेरीस मंगळवारी दुपारी आचार संहितेची प्रतीक्षा संपून केंद्रीय निवडणूक आयोगाने आचार संहिता व निवडणुकीचे वेळा पत्रक जाहीर करण्याचे सकाळीच घोषित केल्याने विद्यमान आमदारांनी आपला कार्य अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी धावपळ सुरू केली. कल्याण पश्चिम विधान सभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी लगबगीने आपल्या विधानसभा मतदार संघातील आमदारकीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील विकास कामाचा कार्यअहवाल प्रकाशित करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले .या कार्याहवाल प्रकाशनाच्या सोहळ्याला जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शिवसेना उपनेत्या विजया पोटे, विधानसभा संघटक संजय पाटील, प्रभूनाथ भोईर, महिला संघटक छायाताई वाघमारे, आदीसह लोकप्रतिनिधी ,अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्य अहवाल जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशित केला.यावेळी बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की आमदार म्हणून निवडून आल्यानंतरची सुरुवातीची अडीच वर्षे ही कोवीडशी लढण्यातच गेली. मात्र त्याकाळातही कोवीड रुग्णालय असो, ऑक्सिजन प्लांट असो, इतर वैद्यकीय साधन सामुग्री असो या सर्वांसाठी आमदार निधी उपलब्ध करून दिला. तर कोवीडनंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि मग खऱ्या अर्थाने कल्याण पश्चिमे कडील विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार निधी, एमएमआरडीए, स्मार्ट सिटी, एमएसआरडीसी अशा विभागांतील तब्बल 2 हजार 38 कोटींची विकासकामे सुरू असल्याची माहिती दिली तसेच आमदारकीच्या कार्यकाळात मतदारसंघातील आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांसह केडीएमसीला स्वतंत्र धरण असावे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT