110 योग साधकांनी एकत्रित येऊन डोक्यावर ग्लास ठेवून गोमुखासन केले असून त्यांना नोबेल वर्ल्ड रेकॉर्डला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.  Pudhari News Network
ठाणे

ठाणे : 110 योगसाधकांनी केला नोबेल वर्ल्ड रेकॉर्ड | Nobel World Record

Gomukhasana : डोक्यावर ग्लास ठेवत केले गोमुखासन

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : कल्याणमधील बालक मंदिर शाळेत झालेल्या नोबेल वर्ल्ड रेकॉर्डला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात 110 योग साधकांनी एकत्रित येऊन डोक्यावर ग्लास ठेवून गोमुखासन केले.

महाराष्ट्र राज्य योगसन असोसिएशनचे सेक्रेटरी दीपेश भोईर, खजिनदार देवेंद्र अजगोलकर यांच्या संकल्पनेतून नोबेल वर्ल्ड रेकॉर्डचे आयोजन करण्यात आले होते. तसेच देवेंद्र अजगोलकर व दीपेश भोईर यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नोबेल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

अनमोल म्हात्रे, वैभव अलीमकर, डॉ. विनय पाटील, अश्विन फुलोरे, अल्का भोईर, राजेंद्र अजगोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच हा नोबेल वर्ल्ड रेकॉर्ड रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटी अध्यक्ष हायसेंट भेतसाईवाला, सचिव निखिल परमार, प्रकल्प प्रमुख मदन शंकलेशा, मीनल जोशी, दीप्ती चित्ते, मीनाक्षी चित्रे, शीतल पाटील, अनुष्का चित्ते, रेवा चिते, काजल नाईक, मयुरी देसाई, करिश्मा जगताप यांच्या सहकार्याने यशस्वी रित्या संपन्न झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT