ठाणे

ठाणे : मुरबाड तालुक्यात २९ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदासाठी १०६ अर्ज

backup backup

मुरबाड; पुढारी वृत्तसेवा : मुरबाड तालुक्यात होऊ घातलेल्या २९ ग्रामपंचायत निवडणूक तसेच १३ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. यामध्ये १६ ते २० ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख होती. परंतु मुरबाड मध्ये १६ व १७ तारीख वगळता १८,१९,२० या तीन दिवसात २९ थेट सरपंच पदासाठी १०६ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. यामध्ये काचकोली, कलंभे, सोनगाव, कोरावळे, महाज, माजगाव, कासगाव यासह ७ ग्रामपंचायतीचे थेट सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तर २९ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी ४०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. २३ ऑक्टोबरला छाननी तर २५ ऑक्टोबरला माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे याकडे तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत. या निवडणूकीनंतर तालुक्यातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. यावरुन तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय वातावरण तापणार असे दिसून येत आहे.

SCROLL FOR NEXT