भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी काही महिन्यांपुर्वी रस्त्यावर उतरून संबधीत अधिकार्‍यांना उपाययोजनांच्या सूचना दिल्या होत्या Pudhari News network
ठाणे

Suresh Mhatre Bhiwandi : वाहतूककोंडी सोडवण्यासाठी खासदार पुन्हा अ‍ॅक्शन मोडवर

पडघा टोल प्रशासनाला खासदार बाळ्या मामांनी धरले धारेवर

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असतांनाच मुंबई नाशिक महामार्गावर सुद्धा वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालक प्रवासी यांना करावा लागत आहे. नित्याच्या समस्येने वाहनचालक त्रस्त आहेत. या समस्येवर तोडगा निघावा यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी काही महिन्यांपूर्वी रस्त्यावर उतरून संबधीत अधिकार्‍यांना उपाययोजनांच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही परिास्थीती जैसे थे आहे. दरम्यान नुकत्याच या वाहतूक कोडींचा फटका पुन्हा आमदारांना बसला असून संबधीतांना चांगलेच धारेवर धरले होते.

मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाक्यावर लांबच लांब लांब रांगा वाहनांच्या लागतात. या वाहतूक कोंडीचा फटका भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना ही बसला आहे.सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे रविवारी रात्री उशिरा शहापूर येथून भिवंडी येथील आपल्या घरी परतत असताना त्यांचा ताफा टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीत अडकला होता.

टोल वसुलीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने झालेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्या साठी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले.यावेळी खासदार बाळ्या मामा यांनी वाहतूक अडवून ठेवणार्‍या टोल प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका केली.या आधी देखील भिवंडीतील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी खासदार बाळ्या मामा रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या या कार्याची नागरिकांकडून प्रशंसा केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT