Dombivli Superstition Incident Pudhari
ठाणे

Dombivli Superstition Incident: डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यावर करणीचे उतारे

काही वर्षांपूर्वी टिटवाळ्याच्या एका मंदिरातील भोंदू बाबावर जादूटोणा, नरबळी, अंधश्रद्धा, अनिष्ट, अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुढारी वृत्तसेवा

बजरंग वाळुंज

डोंबिवली: घराला किंवा व्यक्तीला लागलेली दृष्ट-ईडापिडा व भुताटकी दूर करण्याच्या उद्देशाने अंधश्रद्धेपोटी डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यावर भरदिवसा अज्ञाताने ठेलेल्या करणीबाधेच्या उताऱ्यामुळे आसपाच्या रहिवासी, पादचाऱ्यांसह वाहनचालकांचा भीतीने थरकाप उडताना दिसून आला.

कथित भुताटकीने झपाटलेल्या व्यक्तीवरून किंवा घराची ईडापिडा दूर करण्यासाठी उतरवून काढलेल्या उताऱ्याचा व्हिडिओ एका जागरूक डोंबिवलीकराने समाज माध्यमांवर व्हायरल केल्याने पत्रावळीवरील हा उतारा चर्चेचा विषय बनला आहे. काही वर्षांपूर्वी टिटवाळ्याच्या एका मंदिरातील भोंदू बाबावर जादूटोणा, नरबळी, अंधश्रद्धा, अनिष्ट, अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही घटना ताजी असतानाच डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत आणि सुशिक्षितांच्या नगरीत उताऱ्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा तोडगा शुक्रवारी सकाळच्या सुमारास डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत आणि सुशिक्षितांच्या नगरीत आढळून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कल्याण रोडवर मध्यभागी करणी-भूतबाधेच्या पत्रावळीवरील उताऱ्यात गुलाल फसलेल्या पांढऱ्या कपड्यावर 2 फोडलेले नारळ, 5 अख्खी लिंबे, 2 कापलेली लिंबे, टाचण्या टोचलेली कापडाची काळी बाहुली, काळे तीळ, गुलाब पाण्याची बाटली, हळद, कुंकू, अबीर, बुक्का, गुलाल, पेटलेल्या अगरबत्त्या, आदी काळ्या जादूच्या साहित्याचा समावेश होता. हा उतारा रस्त्याच्या अगदी मध्यभागी ठेवण्यात आल्याचे शुक्रवारी सकाळी एका जागरूक कार चालकाला आढळून आले.

कल्याणला जोडणारा रस्ता, एमआयडीसी, निवासी विभाग, आजदे गाव आणि आजदे पाड्याकडे जाणारा रस्ता असे चौफेर रस्ते मिळत असल्याने या रस्त्यावरील वाहनचालक प्रवास करीत असताना समोरच करणी उतारा लक्ष वेधून घेत आहे.

एकीकडे या करणी उताऱ्याला घाबरून सर्वांनाच त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाने या रस्त्यावरील साहित्य दूर करावे, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT