सुपर एल निनोच्या उंबरठ्यावर जग pudhari photo
ठाणे

Super El Nino : सुपर एल निनोच्या उंबरठ्यावर जग

150 वर्षापूर्वी निर्माण झाली होती महाप्रलंयकारी स्थिती

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : भारतासारखा देश सध्या उष्णतेच्या लाटेत होरपळत असून जगातील सर्वात उष्ण 100 शहरांपैकी 95 शहरे भारतात आहेत. यात विदर्भातील तीन जिल्हे सर्वात आघाडीवर आहेत. त्यामुळे सुपर एल निनो निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुमारे 150 वर्षांपूर्वी अशी महाभयंकर स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी भारत, चीन, ब्राझील, अफ्रिका, ऑस्ट्रेलिया या देशांवर मोठा परिणाम झाला होता.

यात लाखो लोकांना जीवही गमवावा लागला होता. त्यावेळी प्रशांत महासागर तुलनेने थंड अवस्थेत होता. पश्चिम प्रशांत महासागरात उष्ण पाण्याच्या साठा वाढला. 1976 ते 78 मध्ये सुपर एल निनो विकसित होण्यासाठी कारणीभूत ठरला.

1870 साली भयाण अनुभव लोकांनी अनुभवले इतिहास संशोधक मायकेल डेविस यांनी याबाबतचे विश्लेषण लिहले आहे. त्यावेळच्या ब्रिटिश सरकारच्या उदासीन धोरणामुळे मानवनिर्मित नरसंहार पहायला मिळाला होता. आता पुन्हा आपण त्याच मार्गावर आपण जात आहोत का, असा प्रश्न हवामानशास्त्रज्ञांनी विचारला आहे.

डब्ल्यू एम. ओ.च्या अहवालानुसार प्रशांत महासागरात समुद्रपृष्ठाचे तापमान वेगाने वाढत आहे, त्यामुळे एल निनोची स्थिती निर्माण झाली आहे. सुपर एल निनोमुळे हवामान व्यवस्थेत दीर्घकालीन बदल होऊन त्याचे परिणाम वर्षानुवर्षे होत रहातात. मॅक्सिकोच्या आखातेचे तपमान 15-16 च्या एल निनोमुळे वाढत गेली. चक्रीवादळे विनाशकारी होत गेली. भारतासाठी एलनिनो मान्सून रोखणारा ठरत असून देशातील कृषी उत्पनानकरिता तो घातक आहे.

एकूण पाण्यापैकी 70 टक्के पाणी हे नैऋत्य मौसमी पावसातून मिळते. हवामान शास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून हा 92 टक्के होण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम कृषी उत्पादनावर होणार आहे. यामुळे भारताचे वार्षिक नुकसान वाढत जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मात्र 1877 पेक्षा आता आपल्याकडे विज्ञान-तंत्रज्ञान प्रशासकीय ताकद अधिक असल्याने हवामान इशारा यंत्रणा, आपत्कालीन व्यवस्थापन यामुळे या संकटातून तरून जाण्यास मदत मिळेल. मात्र एल निनो हे जगासमोर उभे राहिलेले एक नवे आव्हान आहे.

परिणाम भयानक होऊ शकतात...

एल निनोच्या स्थितीमुळे त्याचे परिणाम भयानक असू शकतात. कारण, दीडशे वर्षापूर्वी आलेल्या एलनिनो -मुळे महाप्रलंयकारी स्थिती उद्भवली होती. त्यावेळी 96 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. वाढत्या उष्णतेमुळे पुन्हा एल निलोची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. 2026 हे वर्ष त्यासाठी धोक्याची घंटा ठरत असून सर्वात उष्ण्ा वर्ष्ा ठरले आहे. यामुळे वार्षिक नुकसान अब्जावधीत जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT