कसारा : ४२ दिवस नाशिक ला आंदोलन केल्या नंतरही राज्यशासन आदिवासी विध्यार्थ्याच्या मागणीला दाद देतं नसल्याने २८ सप्टेंबर रोजी नाशिक ते मुंबई राजभवन असा पायी उलगुलान मोर्चा काल मुंबई च्या वेशिवर म्हणजेच कसाऱ्यात दाखल झाला व आज सकाळी कसारा हुन मार्गस्त झालेला मोर्चा आज शहापूर मध्ये दाखल झाला.
आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्या सह अन्य अनेक महत्वाच्या मागण्यासाठी हा मोर्चा मुंबई कडे निघाला असून १८ ते २२ वयोगटातील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी या मोर्चात सहभागी झाले आहेत. पाच दिवसाच्या या कार्यकाळात मोर्चात सहभागी झालेल्या अनेक विध्यार्थ्यांना उन्हाचे चटके बसल्याने चक्कर आली कोणाच्या पायाला फोड आले तर कोणी बेशुद्ध पडले असे असताना देखील राज्यशासनाचे एकही शिष्ट मंडळ या आदिवासी विध्यार्थ्यांच्या आंदोलनास मध्यस्ती करायला आले नाही.
शेकडो विध्यार्थी पैकी ५ दिवसात ११ मुलांना उष्णतेचा प्रचंड त्रास झाला असे असताना देखील आंदोलक विध्यार्थ्यानी वैद्यकीय उपचार घेऊन पुन्हा मिरच्यात सहभाग घेतला. नंदुरबार सह राज्यातील आदिवासी दुर्गम भागातील विध्यार्थी या मोर्चात सहभागी झाले आहेत.
दरम्यान पायी निघालेल्या या शेकडो विध्यार्थ्यांसाठी नाशिक मुंबई मशामार्गवरील देवा देवताचे मंदिर ट्रस्ट, गुरुद्वारा, यांनी जेवणासाठी मदतीचा हात पुढे केला होता तर कसारा येथील आदिवासी समाज बांधवानी नाश्ता व पाण्याचे वाटप करीत विध्यार्थ्यांना पाठींबा दिला.
तर कमी वयात आपल्या रस्ता मागण्यासाठी निघालेल्या या मोर्चे कराच्या सुरक्षे साठी पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, आप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नागरगोजे,निखिल लसने, पोलीस अधिकारी सुरेश गावित, विनोद कदम, छाया कांबळे, सुनील बच्छाव यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.
पोलिसांचा पण लॉन्ग मार्च....
दरम्यान आदिवासी विध्यार्थ्याच्या या उलगुलान मोर्चा ला संरक्षण देताना पोलीस देखील पायी प्रवास करीत असताना पोलिसाचे हाल होत होते कडक उन्हात बंदोबस्त देतं पायी प्रवास करणाऱ्या व महामार्गवरील वाहतुकीची दिशा बदलत विध्यार्थ्यांच्या मोर्चा ला सरक्षित करताना पोलीस कर्मचारी, अधिकारी विशेष्था महिला भगिनींचे हाल होत होते.