मोखाडा (ठाणे) : हनिफ शेख
पालघर जिल्हा विकासाच्या दिशेने झेपावत असताना दूसरीकडे मात्र दुर्ग म भागातील समस्या सुटण्याची काही नाव घेत नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागाचा आधारवड असलेली लालपरीची अवस्था जिल्ह्यात सध्या बिकट असल्याचे वारंवार घडणार्या प्रसंगावरून दिसत आहे. बोईसर आगाराची एक बस चक्क पावसाळ्यात गळत असल्याचे समोर आले आहे. काही प्रवासी बसमध्ये छत्री तर काहींनी प्लास्टीक कागद डोक्यावरून बसले होते.
मोखाडा तालुक्यातील आसे गावावरून येणारी बस चास येथील विद्यार्थ्यांसाठी थांबली नाही यांमुळे ग्रामस्थानी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जव्हार आगार प्रमुखांना निवेदन दिल्याची घटना ताजी असतानाच आता राज्य परिवहन महामंडळाच्या बोईसर आगाराची एक बस चक्क पावसाळ्यात गळत असल्याची बाब समोर आली आहे. प्रवाशांना बस मध्ये आपल्या सीट वर बसून चक्कं छत्री उघडून तसेच काहींनी प्लास्टिक आपल्या डोक्यावर घेऊन प्रवास केल्याची घटना घडली आहे. यामुळे गरीबांची लालपरीची अशी अवस्था असेल तर सर्व सामन्यांनी प्रवास करायचा कसा हा खरा सवाल आहे.
सध्या कोणत्याही रस्त्याने फिरा कुठे तरी एसटी बस ही बिघडलेल्या अवस्थेत उभी असल्याचे दिसून येते. यामुळे एसटी महामंडळाच्या अनेक बसेस भंगार अव्यस्थेत असल्याचे हे द्योतक आहे. मात्र तरी सुद्धा वाहक आणि चालकांना या बसेस नेण्याच्या सूचना केल्या जातात. नुकतेच विक्रमगड मध्ये मेनरोड वर ठाणे आगाराची एक बस चक्क तिरकी असल्याने एका नव्या कोर्या कारला घासली यावरून मोठा धिंगाणा होऊन ट्रॅफिक झाली होती. आता बोईसर आगाराची नाशिक जाणारी बस ही मोखाडा बसस्थानकावरून जाते यामध्ये मोखाडा येथील काही प्रवासी प्रवास करीत असताना एक वेगळेच चित्र पहावयास मिळाले. कारण बस मध्ये चक्क पाणी होते कारण पुढच्या दोन चार सीटांच्या वर चक्क मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती लागली होती.
यामुळे अनेक प्रवासी बस मध्ये आपल्या सीटरवर छत्री उघडून बसल्याचे दिसले यामुळे अशा नादुरुस्त बसेस दुरुस्त कराव्यात, एसटी महामंडळाने नव्या बसेसची अधिक खरेदी करावी अशी मागणी होत आहे कारण सर्व सामन्यांसाठी स्वस्ताला प्रवास करण्यासाठी ही लालपरी उपयुक्त असून सामान्यांच्या प्रवासातला हा महत्त्वाचा दुवा आहे अस असताना जर या बसेसची अवस्था अशी असेल तर प्रवाशांनी नेमके काय करायचे हा खरा सवाल आहे.