ठाणे

ठाणे : कल्याणात नियंत्रण सुटलेल्या एसटीची वाहनांना धडक; एक जखमी

दिनेश चोरगे

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण पश्चिमेकडील लालचौकी परिसरात एसटी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी (दि.२) दुपारी अपघात घडला. अपघातात एसटीने चार ते पाच वाहनांना धडक दिली. यात एकजण जखमी झाला. बस चालकाची प्रकृती आचानक बिघडल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. आणि हा अपघात घडला.

या अपघाताचा थरार या परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये कल्याण-भिवंडी मार्गावर धावणारी बस (क्र. एम एच १४/ बी टी / ३९६५ ) भरधाव वेगात येणाऱ्या या बसने चार – पाच वाहनांना चिरडले. यामध्ये ४ दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहन चालवित असताना एसटी चालकाला आचानक रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातातील जखमीला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT