डोंबिवली : स्केटिंग असोसिएशन ऑफ कल्याण तालुका आणि स्पोर्ट्स केयर फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शहाडमधील रिजन्सी अन्टालिया येथे ७ वी कल्याण ट्रॉफी खुली स्केटींग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मिरा-भाईंदरच्या स्केटलाईफ स्पीड स्केटींग अकॅडमीने 155 गुण घेत स्पर्धेचे अंतिम विजेतपद पटकावले.
या स्पर्धेतील सर्व विजेत्या संघाना ट्रॉफी आणि खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत मुंबई विभागामधून ३३० खेळाडूंनी सहभाग घेऊन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही स्पर्धा स्केटींगच्या ५ विविध प्रकारांत खेळविण्यात आली. प्रशिक्षक संतोष मिश्रा यांचे सर्व खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे स्पर्धेला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
पार्थी परमार (सुवर्ण), रोशन कोसांबिया (सुवर्ण), आकृती संजय झा (सुवर्ण), जियाना शेट्टी (सुवर्ण), सात्विका मूर्ती (सुवर्ण), त्विषा जव्हेरी (सुवर्ण), वेदांत शिंदे (सुवर्ण), रूद्रांश दास (सुवर्ण), मालविका बाईंग (सुवर्ण), मोहमद इब्राहिम (सुवर्ण), प्रशिव लोटके (सुवर्ण), ध्रुविका रावराणे (सुवर्ण), आरव सिंह (सुवर्ण), मार्विन डिसोझा (सुवर्ण), जियान प्रजापती (सुवर्ण), प्रिशा सिंह (सुवर्ण), ह्रिद्या देशमुख (सुवर्ण), ओम हांडे (सुवर्ण), विवान गुप्ता (सुवर्ण), प्राक्षी चौधरी (सुवर्ण), हृदयम महींकार (सुवर्ण), आरूष अय्यर (सुवर्ण), श्रवंती (रौप्य), अलिश्बा शेख (रौप्य), रोनक कोसांबिया (रौप्य), शौर्य गोहिल (रौप्य), नीरव पाटील (रौप्य), रिशाल जैन (रौप्य), झारा फातिमा (रौप्य), स्वरांजली ससाणे (रौप्य), भव्य शाह (रौप्य), आलिया शेख (रौप्य), कबीर शेख (रौप्य) आणि प्रियांश पठारे (रौप्य) अशी पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंची नावे आहेत.