सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक File Photo
ठाणे

Solapur District Bank : सोलापूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ लवकरच बरखास्त होणार

प्रशासन नियुक्तीच्या हालचाली

पुढारी वृत्तसेवा

दिलीप शिंदे

ठाणे : ठाणे, यवतमाळ, नांदेड जिल्हा बँकांचे संचालक मंडळ सोमवारी बरखास्त होऊन जिल्हा उपनिबंधकांनी प्रशासक म्हणून बँकेचा कारभार हाती घेतला आहे. त्यामुळे मुदत पूर्ण होऊ घातलेल्या सोलापूर जिल्हा बँकेसह राज्यातील संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, धुळे, जळगाव, जालना, अहिल्यानगर, बीड बँकांच्या निवडणूक अपेक्षित आहेत. त्यामुळे या बँकांचे संचालक मंडळ बरखास्त होऊन तेथे प्रशासकाची नेमणूक होणार आहे. प्रशासकीय पातळीवर तशा हालचाली सुरू आहेत. यासंदर्भात दैनिक ‌‘पुढारी‌’ने दिलेले वृत्त खरे ठरले आहे.

बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम 2025 नुसार सलग दहा वर्षे संचालकपद भूषविणारे संचालक हे पुढील निवडणूक लढवण्यास अपात्र ठरविले आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज नेते, सहकार महर्षीना झटका बसला आहे. यापूर्वी बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतरही निवडणुका होईपर्यंत बँकेचा कारभार जुने संचालक मंडळ हाकायचे; मात्र महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 73 अ (3) (1) (ब) यातील तरतुदीनुसार बँकेचा प्रभारी कारभार जुन्या संचालक मंडळाकडे न देता प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे देण्याचा निर्णय झाला. ‌‘अ‌’ वर्ग संस्थेत मुदत संपलेले मंडळ कार्यरत ठेवू नये, तेथे प्रशासकच नियुक्त करावा, असा नवीन कायदा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT