ठाणे

ठाण्यात सहा वर्षीय मुलीवर अत्याचार; ५५ वर्षीय नराधम अटकेत

backup backup

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाण्याच्या माजीवाडा भागात ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका ५५ वर्षीय वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी समोर आली. पीडित मुलीला ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, नराधम आरोपीला सोमवारी रात्री मुंबईतून कापूरबावडी पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. तो मूळचा पश्चिम बंगाल येथे राहणारा असून सध्या तो माजिवडा परिसरात राहतो.

पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांशी आरोपीची ओळख असून त्यांच्या घरी येणे जाणे होते. याच ओळखीचा फायदा घेऊन नराधम आरोपीने सोमवारी दुपारी चिमुकलीवर अत्याचार करून पळ काढला. पीडित मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितल्या नंतर ही घटना समोर आली. या प्रकरणी पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच कापूरबावडी पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी दोन पथके स्थापन केली. या पथकाने सोमवारी रात्री आरोपीस माहीम स्टेशनसमोरून अटक केली. तो बंगाल राज्यात पळून जाण्याचा तयारीत होता असे देखील आरोपीने पालिसांसमोर कबुली दिली.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT