एसआयटीने बदलापूर येथील शाळेच्या दोन विश्वस्तांना फरार म्हणून घोषित केले आहे.  file photo
ठाणे

Badlapur sexual assault | बदलापूरच्या शाळेचे दोन विश्वस्त फरार घोषित!

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुकलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा (Badlapur sexual assault) तपास करणाऱ्या एसआयटीने शाळेच्या दोन विश्वस्तांना फरार म्हणून घोषित केले आहे. या दोघांचा गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांची पथके शोध घेत आहेत. एसआयटीने त्यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता आणि त्यांना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.

बदलापुरातील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी बदलापूर येथील शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सेक्रेटरी तुषार आपटे आणि मुख्याध्यापिका आठवले यांचा पहिल्या टप्प्यात पोलिसांनी पाहिजे असलेल्या आरोपींमध्ये समावेश केला आहे. यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. तसेच उर्वरित संस्थाचालकांचेही जबाब नोंदवण्याचे काम एसआयटीकडून करण्यात येत असून त्यांच्यावरही अटकेची तलवार कायम आहे.

Badlapur Case : दोघे विश्वस्त गायब

हे दोघेही तपासादरम्यान पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, जेव्हा पोलिसांचे पथक दोन्ही विश्वस्तांच्या घरी गेले तेव्हा ते त्यांच्या घरी दिसून आले नव्हते. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची ओळख परेड करणार असल्याचे एसआयटीने यापूर्वी सांगितले होते. ही ओळख परेड कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होईसल, जिथे पीडित आरोपींना ओळखतील.

नराधम अक्षय शिंदे न्यायालयीन कोठडीत

दोन चिमुकलींवर अत्याचार करणार्‍या नराधम अक्षय शिंदे याला कल्याण सत्र न्यायालयाने नुकतीच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अक्षय शिंदे याला १७ ऑगस्ट रोजी अटक केल्यानंतर पहिल्यांदा न्यायालयाने तीन दिवसांचे कोठडी सुनावली होती. त्यानंतर राज्य शासनाने नेमलेल्या एसआयटीने पोलीस कोठडी वाढवून देण्याचे मागणी केल्यानंतर अक्षय शिंदे याला ५ दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली होती. ही पोलीस कोठडी संपल्यानंतर गेल्या सोमवारी अक्षय शिंदे याला मोठ्या पोलीस फौज फाट्यासह कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT