थरांची स्पर्धा... बाळ गोपाळांचा जल्लोष file photo
ठाणे

Shri Krishna Janmashtami : मच गया शोर ‘ठाणे नगरी’ में...

ठाण्यात आज रंगणार दहीहंडीचा थरार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : थरांची स्पर्धा... बाळ गोपाळांचा जल्लोष.... बक्षिसांची लयलूट असा माहोल दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आज मंगळवार (दि.27) गोपाळकाल्याच्या दिवशी ठाण्यात पाहायला मिळणार आहे. गोविंदांची पंढरी म्हणून ठाणे शहराची ओळख आहे. ठाण्यातील काही प्रमुख दहीहंडी प्रसिद्ध आहेत. भाजपचे कृष्णा पाटील आयोजित 55 लाखांची गोकुळ हंडी तसेच संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी यंदाच्या दहीहंडी उत्सावाला लाडक्या बहीण योजनेची जोड दिली आहे. लाडक्या बहिणींसाठी विशेष सन्मान हंडी बांधण्यात येणार आहे. त्यामुळे एकुणच आजचा उत्साह मच गया शोर ‘ठाणे नगरी’ में...असाच म्हणता येईल

  • सिने कलाकारांची हजेरी, थरांची स्पर्धा, बक्षिसांची लयलूट, गोविंदांचा टिपेला जाणारा उत्साह

  • ठाण्यातील विश्वविक्रमी दहीहंडीचा यंदा वेगळाचा उत्साह

थरांची स्पर्धा...बक्षिसांची लयलूट...सिने कलाकारांची हजेरी आणि गोविंदांचा टिपेला जाणारा उत्साह असा थरांचा थरथराट दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील दहीहंडी उत्सवात पाहायला मिळणार आहे. मुंबईसह आजूबाजूच्या शहरातील लहान - मोठ्या गोविंदा पथकांकडून ठाण्यातील दही हंड्यांमधील बक्षीसरूपी ’लोणी’ मिळवण्यासाठी स्पर्धा रंगणार आहे. मुंबई, ठाणे आणि दहीहंडी यांचे नाते गेल्या पन्नास वर्षांपासून आहे. मात्र सध्या राजकीय दहिहंड्यांमुळे या उत्सवाला ग्लॅमरस स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र आता शासनाने दहीहंडी खेळाला साहसी क्रीडाप्रकार म्हणून स्थान दिल्याने या उत्सवाची प्रतिष्ठा आणखी वाढली आहे. जवळपास 64 हजार गोविंदांनी विमा उतरवला आहे. त्यामुळे विम्याचे सुरक्षा कवच लाभलेला हा उत्सव अधिक विस्तारणार आहे.यासोबतच नऊ थरांचा विक्रम मोडून दहा थरांचा यशस्वी मनोरा कोणत्या गोविंदा पथकाकडून रचला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सव आयोजकांकडून गोविंदा पथकांवर लाखोंच्या रकमांच्या बक्षिसांची उधळण केली जाणार आहे.यामध्ये प्रामुख्याने टेंभी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या दहीहंडी उत्सवासह येथून हाकेच्या अंतरावर जांभळी नाका येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी खासदार राजन विचारे आयोजित निष्ठेची महा दहीहंडी उत्सव दरवर्षी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतो.

नौपाडा येथील विष्णूनगर परिसरात भगवती शाळेच्या मैदानात मनसे नेते अविनाश जाधव यांच्या वतीने तर रघुनाथ नगर येथे शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात येतो. वर्तकनगरात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व युवासेनेचे पूर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव होत असतो.

शारदा संकल्प प्रतिष्ठानची 55 लाखांची हंडी

शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत 55 लाखांची बक्षिसेजाहीर करण्यात आली आहेत. प्रथम नऊ थर लावणार्‍या गोविंदा पथकास 5 लाख 55 हजार 555 रोख रक्कम व चषक बक्षीस दिले जाणार असून पुढील प्रत्येक नऊ थरास रुपये 3 लाख 33 हजार 333 रुपये रोख रक्कम व चषक बक्षीस म्हणून दिले जाणार असल्याची माहिती भाजपचे कृष्णा पाटील यांनी दिली. ठाण्याची हंडी 2 लाख 22 हजार 222 रुपये व चषक त्याचबरोबर मानाची गोकुळ हंडी महिला गोविंदा पथकास एक लाख 11 हजार 111 व चषक असे बक्षीस आहे.आठ थराची सलामी 51 हजार व चषक,सात थराची सलामी 12,000 अशी अनेक बक्षिसे महिलांसाठी ठेवण्यात आली आहेत.

शारदा संकल्प प्रतिष्ठानची 55 लाखांची हंडी

शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत 55 लाखांची बक्षिसेजाहीर करण्यात आली आहेत. प्रथम नऊ थर लावणार्‍या गोविंदा पथकास 5 लाख 55 हजार 555 रोख रक्कम व चषक बक्षीस दिले जाणार असून पुढील प्रत्येक नऊ थरास रुपये 3 लाख 33 हजार 333 रुपये रोख रक्कम व चषक बक्षीस म्हणून दिले जाणार असल्याची माहिती भाजपचे कृष्णा पाटील यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT