ठाणे सिव्हील रुग्णालयात जखमी गोविंदासाठी 30 बेडचा विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.  pudhari news network
ठाणे

Shri Krishna Janmashtami : जखमी गोविंदांसाठी सिव्हिलमध्ये 30 बेडचा विशेष कक्ष

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातील दहिहंडी उत्सवाचा थरार बघण्यासाठी ठिकठिकाणाहून नागरिक येत असताना, या उत्सवात कोणता गोविंदा जखमी होणार नाही यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. ठाणे सिव्हील रुग्णालयात जखमी गोविंदासाठी 30 बेडचा विशेष कक्ष तयार केला असून, महत्वाच्या मोठ्या दहीहंडी ठिकाणी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक तैनात केले आहे.

दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी ठाणे शहरात बघायला मिळत असून, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह जल्लोष पहायला मिळणार आहे. मात्र दही हंडीत गोविंदाचे मनोरे रचताना, गोविंदाची काळजी खूप महत्वाची आहे. कोणताही गोविंदा थरावरून पडल्यावर, जखमी गोविंदासाठी तात्काळ मदत मिळेल, या दृष्टीने उपाय योजना ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे सिव्हील रुग्णालयात जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांनी दिली.

औषध, इतर सामुग्री तैनात

ठाण्यात सर्वच ठिकाणी मोठ्या दहीहंड्या लावल्या असून, सात, आठ, नऊ, दहा थरांचे मनोरे रचण्यासाठी सर्वच गोविंदा पथक सज्ज झाली आहेत. मात्र मोनोरा पडून गोविंदा जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सिव्हील रुग्णालयात 30 बेडचा अद्यावत कक्ष उभारला आहे. वैद्यकीय पथक, औषध, इतर सामुग्री तैनात ठेवली आहे.

ठाण्यातील प्रमुख मोठ्या दहीहंडी उत्सवाठिकाणी पाच ते सहा रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक ठेवण्यात आले आहे. जखमी रुग्णांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक असून, त्या दृष्टीने सिव्हील रुग्णालय सज्ज आहे.
डॉ. धीरज महांगडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हील रुग्णालय, ठाणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT