बलात्कार file photo
ठाणे

धक्कादायक! डोक्याचे केस पकडले, तोंड दाबले अन् चाकूचा धाक दाखवून सामुहिक बलात्कार

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील एकरा परिसरात चाकूचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून पुढील तपास तुळींज पोलीस करत आहे.

राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणार्‍या अत्याचाराचा घटनेत लक्षणीय वाढ झाली. बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

नालासोपार्‍यात राहणारी 32 वर्षीय पीडित महिला ही मंगळवार, दि. 10 सप्टेंबरला रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मुलाला बोलविण्यासाठी गेली होती. तेव्हा तेथे आरोपी जितेंद्र यादव उर्फ काटु हा त्यांच्या पाठीमागून येऊन महिलेच्या डोक्याचे केस पकडून एक हाताने तोंड दाबले. नंतर एका गल्लीतून खेचत एकाच्या रुममध्ये नेवून जितेंद्र व दुसरा आरोपी अवी जैसवाल उर्फ बिल्लु याने पीडित महिलेला चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने शारीरीक अत्याचार केला. तसेच जर सदर प्रकार कोणास सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी दोन्ही आरोपींनी त्यांना दिली. शेवटी शनिवारी, दि.14 पीडित महिलेने तुळींज पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचे आरोपी सोबत काही वाद असल्याची माहिती मिळाली आहे. झालेला हा प्रकार खरा आहे की खोटा आहे याचा तपास करत आरोपींचा शोध घेत असल्याचे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT