ठाणे ः एस.टी. महामंडळ शिवशाही बसच्या रूपाने पांढरा हत्ती पोसते आहे. शिवशाही बसचे अपघात, या बसची दिवसेंदिवस होणारी दुरावस्था यावर अनेकदा टीका होते. शुक्रवारी सकाळी राज्याच्या परिवहन मंत्र्यांच्या शहरातील प्रवाशांनी शिवशाहीची दुरावस्थेला वाचा फोडली. शुक्रवारी पहाटे ठाण्यातील वंदना आगारातून सुटणारी ठाणे - कोल्हापूर ही शिवशाही बस तांत्रिक बिघाडामुळे पाऊण तास उशीरा सुटली. बसमधील फाटके शिट्स, वातानुकुलित न होणारी यंत्रणा, पावसाचे पाणी हात गळते की अशा आकारची मोठी भोके, या सर्वांचे चित्रीकरण करून प्रवाशांनी शिवशाहीची दुरावस्था चव्हाट्यावर आणली.
शिवनेरी नंतर एस. टी. महामंडळाच्या ताफ्यात आलेल्या शिवशाही बससेवेने प्रवाशांच्या अपेक्षावर सुरवातीपासूनच पाणी फेरले आहे. सुरवातीला अपघातामुळे चर्चेत आलेल्या शिवशाही आता सुविधांचेही तीन - तेरा वाजले आहे, याची प्रचिती या बसने शुक्रवारी सकाळी ठाणे - कोल्हापूर या शिवशाहीने प्रवास करणार्या प्रवाशांनी घेतला. अतिशय वाईट सेवा.... अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर फिरत आहेत.
आरामदायी व वातानुकूलित प्रवासासाठी प्रवासी शिवशाही बसला प्राधान्य देतात.परंतु ठाणे येथून कोल्हापूर ला जाण्यासाठी वंदना बसस्थानकातून न सकाळी 5.15 असलेली परंतु पाऊण तास उशिराने सुटली. बसच्या चालकाच्या समोरील तुटलेली काच, नादुरुस्त आसन व्यवस्था, अस्वच्छता,फाटलेल्या सीट,उखडलेले पत्रे, अशा नादुरुस्त बस मधून प्रवाशांनी जीव मुठीत धरून प्रवास केला. ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे यांना फोन वर संपर्क साधत माहिती दिली असता.त्यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
आगारातून निघणार्या बसेस सुस्थितीत आहेत का हे न बघता शिवशाही’ ची ठाणे-कोल्हापूर खराब बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून चालवली जात आहे. खरे तर ठाण्याहून सुटणार्या या शिवशाही बस मधून परिवहन मंत्र्यांनी प्रवास केला पाहिजे. म्हणजे त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा कळतील. तसेच अशा खराब बसमुळे एखादा अपघात झाला तर याची जबाबदारी परिवहन मंत्री घेणार का....?राहुल पिंगळे, काँंग्रेस प्रक्वते, ठाणे