शिवसेना नवी मुंबईचा वचपा ठाण्यात काढणार pudhari photo
ठाणे

Shiv Sena vs BJP Thane : शिवसेना नवी मुंबईचा वचपा ठाण्यात काढणार

परिवहन समितीवर शिवसेनेच्याच 12 सदस्यांची वर्णी लावण्याची आखली रणनीती

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन समिती निवडणुकीत शिवसेनेला शह देणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा वचपा 5 मार्च रोजी होणाऱ्या ठाणे महापालिका परिवहन समितीच्या निवडणुकीत काढला जाणार असून या समितीवर बराही सदस्य शिवसेनेचे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना भाजपाचा संघर्षाचा दुसरा अंक ठाणेकरांना पाहता येण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीची निवडणूक 5 मार्च रोजी होणार असून या निवडणुकीचे नमानिर्देशीत पत्राचे वाटप 25 तारखेला होणार आहे. 5 मार्च रोजी 12 जागा करिता निवड केली जाणार आहे . नवी मुंबई महापालिकेत सत्ताधारी भाजपाने सत्तेच्या जोरावर 12 ही सदस्य सर्वाधिक संख्या बाळाच्या जोरावर निवडून आणले होते. ही निवड करताना तेथे कलम 25(2)आणि (3)चा वापर केला होता.

संपूर्ण राज्यात कलम 31अ पोट कलम 2 चा वापर करून प्रत्येक पक्षाच्या तौल्लानिक संख्यबळानुसार सदस्यांची निवड केली जाते. त्यामुळे सर्व पक्षाच्या सदस्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. मात्र नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपाने कलम 25(2)(3)चा वापर केला होता, तसाच वापर ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेकडून होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईचा भाजपचा वचपा शिवसेना ठाणे महापालिकेत काढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सत्तेत असतानाही विरोधी पक्षाची भूमिका घेणाऱ्या भाजपाला विशेष समितीच्या निवडणुकीत देखिल काहीच वाटा द्यायचा नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचे शिवसेनेच्या सूत्रांकडून समजते. गट मिटिंग मध्ये सर्वसाधारण सभा सुरळीत पार पाडण्याचे ठरले असतानाही भाजपाने गोंधळ घातला होता त्यामुळे त्यांना सत्तेत वाटच द्यायचा नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचे बोलले जात आहे.

  • नवी मुंबई महापालिकेत सत्ताधारी भाजपाने सत्तेच्या जोरावर 12 ही सदस्य सर्वाधिक संख्या बळाच्या जोरावर निवडून आणले होते. ही निवड करताना तेथे कलम 25(2)आणि (3)चा वापर केला होता. संपूर्ण राज्यात कलम 31अ पोट कलम 2चा वापर करून प्रत्येक पक्षाच्या तौल्लानिक संख्यबाळानुसार सदस्यांची निवड केली जाते त्यामुळे सर्व पक्षाच्या सदस्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. मात्र नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपाने कलम 25(2)(3)चा वापर केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT