कामरा याच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आज ठाण्यात शिवसैनिकांनी त्याचे प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. (छाया : अनिशा शिंदे)
ठाणे

कुणाल कामरा विरोधात शिंदेंची शिवसेना ठाण्यात आक्रमक, प्रतिकात्मक पुतळा जाळला

Kunal Kamra Controversy : कामरा याच्या विरोधात राज्यभर संतापाची लाट

दिलीप शिंदे

ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका करणारे स्टॅंड अप कॉमेडियन कुणाल कामरा याचे मुंबईतील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले आहे. कामरा याच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आज सोमवार (दि.24) रोजी ठाण्यात शिवसैनिकांनी त्याचे प्रतिकात्मक पुतळा जाळून त्याच्या अटकेची मागणी केली आहे. (स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा Kunal Kamra)

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंमबनात्मक काव्य करून त्यांच्या रिक्षाचालक ते राज्याचे मुख्यमंत्री या प्रभावी वाटचालीची खिल्ली उडवत त्यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. त्यामुळे शिवसैनिक तसेच मित्रपक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे सूर उमटले आहेत. कामरा यांच्या टीकेमुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी रविवारी (दि.23) रोजी रात्री त्यांच्या स्टुडिओमध्ये घुसून तोडफोड केली. तसेच त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कुणाल कामरा यांची विडंबनात्मक पोस्ट काय होती तुम्हीच बघा...

या घटनेमुळे शिवसैनिक तसेच मित्रपक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे सूर उमटले आहेत.

पडसाद विधिमंडळात उमटले

या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांनीही कामरा याला धारेवर धरले. शिवसेनेच्या नेत्यांनी यामागे खासदार संजय राऊत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे.

तर सगळे शो बंद पाडू ...

दुसरीकडे ठाण्यात शिवसैनिकांनी दुपारी कामरा याचा प्रतिकात्मक पुतळा बनवून तो पायाखाली तुडवला आणि त्याचे दहन केले. पोलिसांनी शिवसैनिकांना अडविण्याचे प्रयत्न केले. मात्र गद्दार कुणाल कामरा याला अटक करण्याची मागणी करीत त्याच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

दरम्यान, खासदार नरेश म्हस्के यांनी कुणाला कामरा याला सज्जड दम देत यापुढे असे प्रकार घडल्यास त्याचे सगळे शो बंद पडण्याचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT