Sharmila Pimpalolkar Thane Mayor Pudhari
ठाणे

Sharmila Pimpalolkar Thane Mayor: शर्मिला पिंपळोलकर यांनी स्वीकारला महापौरपदाचा कार्यभार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शपथ; कृष्णा पाटील यांच्याकडे उपमहापौरपदाची धुरा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर - गायकवाड ह्यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर - गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.

तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित उपमहापौर कृष्णा दादू पाटील यांनाही उपमहापौर पदाचा कार्यभार देण्यात आला. यावेळी भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, शिवसेना गटनेते पवन कदम, तसेच शिवसेना भाजप महायुतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (छाया : अनिषा शिंदे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT