शहापुरातील एका नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणार्या, 10 ते 12 विद्यार्थिनींचा मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने, विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सीबीएसई माध्यमाच्या या शाळेत काल दि.8 जुलै रोजी शाळेतील शौचालयातील भिंतीवर व लादीवर रक्त सांडलेले दिसल्याने मासिक पाळी या अनुषंगाने शाळेतील काही मुलींचे कपडे काढून तपासणी करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आज 9 जुलै रोजी शाळेत जमाव करून संताप व्यक्त केला. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांना घेराव घालून जाब विचारला.
घडलेल्या प्रकाराबाबत शहापूर पोलिस ठाण्यात 1 मुख्याध्यापिका, 4 शिक्षिका, 1 महिला शिपाई व 2 संस्था पदाधिकारी यांच्यावर पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.