Shahapur hit by heavy rain
अतिवृष्टीमुळे घर कोसळून चार जण जखमी. Pudhari File Photo
ठाणे

शहापूरात अतिवृष्टीमध्ये घर पडून चार जखमी

पुढारी वृत्तसेवा
राजेश जागरे

शहापूर : मागील दोन दिवस सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वेहलोंडे अंतर्गत येणाऱ्या सापटेपाडा येथील त्र्यंबक पाचालकर यांचे राहते घर पडले असून यामध्ये लाडक्या त्र्यंबक पाचालकर,जनी पाचालकर, शांता पाचालकर आणि विजय पाचालकर हे रात्री एकत्र बसले असताना अचानक घर कोसळल्याने घरातील वरील व्यक्ती जखमी झाले आहेत. सदर घटना गुरुवारी रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान घडली.सदर जखमी व्यक्तींना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र अघई या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे.

झोळी करून जखमी व्यक्तींना नेले रस्त्यापर्यंत

सापटेपाडापासून मुख्य रस्ता दोन किमी अंतर लाब असून या पाड्याला अजूनही मुख्य रस्त्यास जोडण्याकरिता कुठलाही रस्ता उपलब्ध नाही. रस्ता नसल्याने गावातील कार्यकर्त्यांनी झोळी करून जखमी व्यक्तींना मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन गेले व त्या ठिकाणावरून त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT