Thane News Pudhari
ठाणे

Thane News: ठाण्यात मृतदेह आढळण्याच्या घटनांमध्ये होतेय मोठी वाढ

अलीकडच्या काळात 4 अज्ञात मृतदेह

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे शहराच्या ठाणे नगर आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध भागात मागील काही दिवसांमध्ये अज्ञात बेशुद्ध अवस्थेतील इसम आढळण्याची प्रकार वाढीस लागलेले आहेत. ठाण्यात चार अनोळखी इसमाचे मृतदेह आढळलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अनोळखी इसम हे बेशुद्ध अवस्थेत वाढलेले असले तरीही त्यांना उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केलेले आहेत. मृत व्यक्तीची नोंद विविध पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे तर स्थानिक पोलीस मात्र मृतकाच्या नातेवाईक यांचा शोध घेऊन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पहिली घटना भंडार आळी, दर्ग्याजवळ येथे घडली.अंदाजे 40 वर्षीय इसम बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. त्याच्या उजव्या हातावर सूर्य आणि ‌‘ॐ‌’ चिन्हाचे गोंदण असून अंगात लाल टी-शर्ट व काळी हाफ पँट होती. दुसऱ्या घटनेत टॉवर नाका भाजी मार्केटसमोर अंदाजे 40 वर्षीय इसम आढळला. त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाखाली गोंदण असून अंगात हिरवा शर्ट व निळी पँट होती.

तिसऱ्या घटनेत वागळे इस्टेट परिसरात अंदाजे 45 वर्षीय इसम आजारी अवस्थेत मिळून आला. त्याने लाल-सफेद रंगाचा टी-शर्ट व निळी पँट परिधान केली होती. तर चौथी घटना ठाणे-भिवंडी एसटी बसस्टॉपसमोर घडली.

अंदाजे 30 वर्षीय इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या अंगात पांढरा पट्टेरी शर्ट आणि निळी जिन्स होती. या चारही मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी ठाणेनगर किंवा वागळे इस्टेट पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मृत व्यक्ती फिरस्ते

ठाणे नगर आणि वागले इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या चार अज्ञात व्यक्तींचा मृतदेह सापडले आहेत. दरम्यान सदरचे इसम हे आजारी अवस्थेत आणि बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने त्या व्यक्ती या फिरस्ते किंवा भिकारी असल्याचा संशय आहे.

दरम्यान पोलीस ठाण्यात या मृत व्यक्तींची माहिती नमूद केलेली असताना ही पोलिसांना नातेवाईकांच्या शोधासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय खरा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT