शाम धुमाळ
कसारा : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गवरील इगतपुरी ते कसारा दरम्यान चॅनल नंबर 636 या ठिकाणी बोगद्याच्या पुढे मुंबई वाहिनी वर रात्री 7:35 च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने मुंबई कडे जाणारी वाहतूक 20 मिनिटात विस्कळीत झाली.
दोन दिवसापासून कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे समृद्धी महामार्गवरील इगतपुरी बोगद्या जवळ मातीचा मलबा व महाकाय दरडी रस्त्यावर आल्या. या दरम्यान सुदैवाने कोणत्याही प्रकारची वाहने रस्त्यावर नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग वरील यंत्रनेने जेसीबी व हायड्रा क्रेनच्या मदतीने महामार्गावरील दरड व मातीचा मलबा दूर करून वाहतूक सुरळीत केली.
घटनास्थळी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे, महामार्ग पोलीस अधिकारी छाया कांबळे, यांनी धाव घेतला परिस्तिथीची माहिती घेतली. दरम्यान मुंबई कडे जाणारी वाहतूक 20 मिनिट विस्कळीत झाली होती.