ठाणे

पनवेल केस : सलमान खान हल्ला कटप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

अनुराधा कोरवी

पनवेल : पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानवरील हल्ल्याच्या कटाचा पर्दाफाश करत चौघांना अटक केली. याप्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दीपक हवासिंग गोगालिया उर्फ जॉनी वाल्मिकी (३० रा. ग्राम तिग्रणा ठाणा, भिवानी, हरीयाणा) असे आरोपीचे नाव असून त्याला पनवेल आणि नवी मुंबई पोलिसांनी भिवानी येथून १ जून रोजी अटक केली.

सलमान खानला धमकी देणारे लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार गँगमधील साथीदार पनवेल व कळंबोली परिसरात राहात आहेत. त्यांनी सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊस, बांद्रा येथील त्यांचे राहते घर तसेच शूटिंगच्या ठिकाणी पाळत ठेवून त्याच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर रेकी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी चक्रे गतिमान केली. पनवेल शहर पोलिसांनी केलेल्या जलद तपासानंतर यातील ३१ पैकी ४ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, १ जून रोजी याप्रकरणातील आणखी एक आरोपी दीपक याला अटक करण्यात आली. त्याने आरोपींची राहण्याची व गुन्हा करण्यासाठी वाहनांची व्यवस्था केल्याचे समोर आले आहे. तो व्हिडीओ कॉलद्वारे कटातील आर- मारण्याची आरोपींच्या संपर्कात होता.

नवी मुंबई पोलीस परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी त्याच्या वास्तव्याबाबत भिवानी पोलीस अधिक्षक वरूण सिंघला यांना माहिती कळविली असता त्यांनी भिवानी क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक रविंद्र व त्यांच्या पथकाच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT