Kalyan railway station rescue Pudhari
ठाणे

Kalyan railway station rescue: जवानामुळे आईसह बाळाला जीवदान; कल्याण रेल्वेस्थानकावर घटनेचा थरार

या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनमधून उतरताना प्लॅटफॉर्मवर पडणाऱ्या आई आणि एक वर्षीय बाळाला आरपीएफ जवानाने वाचविले. आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आहे.

28 एप्रिल रोजी सायंकाळी धावत्या ट्रेनमधून उतरताना घसरलेल्या महिला आणि तिच्या एक वर्षीय बाळाला आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक हेमंत भरगुडे यांनी तत्काळ धाव घेत सुरक्षितरित्या वाचवले.

प्रवासी महिला अंतिमा शुक्ला आपल्या एक वर्षीय मुलासह प्रयागराज ते मुंबई असा प्रवास करत होती. ट्रेन कल्याण स्थानकात येत असताना महिलेने उतरण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि ती बाळासह प्लॅटफॉर्म व रेल्वेगाडीच्या मधील जागेत घसरली.

मात्र तेथे कर्तव्यावर असलेले आरपीएफ जवान हेमंत भरगुडे यांनी प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता धाव घेत दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT