डिकॉस्टा अ‍ॅन्थोनी अमेरिकन निवासी यास बॅग सुरक्षितरित्या परत करताना लोहमार्ग पाेलीस.  pudhari news network
ठाणे

ठाणे : लग्न ठरलेल्या तरुणाची धांदल; खरेदी केलेल्या वस्तूंची बॅग विसरला लोकलमध्ये

Karjat Local Railway Police : लोकलमध्ये विसरलेली लग्नाच्या खरेदीची बॅग परत

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : अमेरिकेत नोकरीनिमित्त स्थायिक असलेला एका नागरिक त्याच्या लग्नानिमित्त भारतात आला असून तो कर्जत परिसरात सद्या राहत आहे. त्याने लग्नानिमित्त खरेदी केलेल्या वस्तू, अमेरिकन चार हजार डॉलर असा एकूण 4 लाख 75 हजाराचा ऐवज असलेली बॅग हा विदेशी नागरिक कर्जत लोकलमधून उतरून घेण्यास विसरला. या नागरिकाने ही माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये विसरलेली ही बॅग उतरून घेतली. ही बॅग सुरक्षितरित्या परत मिळाल्यानंतर अमेरिकन नागरिकाने महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक केले.

डिकॉस्टा अ‍ॅन्थोनी असे या अमेरिकन निवासी नागरिकाचे नाव असून ते सद्या कर्जत परिसरात राहतात. लग्नानिमित्त ते भारतात परतले आहेत. लग्नासाठी लागणारी खरेदी करण्याकरिता डिकॉस्टा अ‍ॅन्थोनी यांनी मुंंबईत सोन्याची अंगठी, कपडे, आदी सामान खरेदी केले. हे साहित्य एका बॅगेतून ते मुंबईहून कर्जत लोकलने कर्जतला परतले. लोकलमधून कर्जत येथे उतरून गेल्यानंतर त्यांना आपली बॅग लोकलमध्येच विसरल्याचे असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने लोहमार्ग पोलिसांशी हेल्पलाईनवर संपर्क साधला. बदलापूर रेल्वे स्थानकात तैनात असलेले पोलिस उपनिरीक्षक के. एस. सूर्यवंशी आणि हवालदार पी. एल. जाधव यांना कर्जतकडून निघालेल्या सीएसएमटी दिशेकडील चौथ्या डब्यात एक काळी बॅग आढळून आली. ही बॅग ताब्यात घेण्याची सूचना पोलिस नियंत्रण कक्षाकडून करण्यात आली. उपनिरीक्षक सूर्यवंशी आणि हवालदार जाधव यांनी डब्यातून डिकॉस्टा यांची रॅकवर ठेवलेली पिशवी ताब्यात घेतली. तसा निरोप त्यांनी नियंत्रण कक्षाला दिला. पिशवीमध्ये चार हजार अमेरिकन डॉलर (चार लाख रूपये), सोन्याची अंगठी, कपडे, पासपोर्ट, आयफोन, चॉकलेटची पाकिटे होती. या ऐवजाची एकूण किंमत 4 लाख 75 हजार रूपये होती. उपनिरीक्षक सूर्यवंशी हा ऐवज असलेली बॅग घेऊन कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात पोहोचल्या. सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एस. देशमुख यांनी बॅग हरवलेल्या डिकॉस्टा यांना लोहमार्ग पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. पंचांसमक्ष त्यांची ऐवजाची बॅग त्यांना परत केली. याबद्दल अ‍ॅन्थोनी यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT