Dombivli Doctor assault case pudhari photo
ठाणे

Dombivli Doctor assault case : डिस्चार्ज ऐनवेळी रद्द; रमेश म्हात्रेला वाचवतोय कोण?

सत्ताधारी पक्षातील या आरोपी नगरसेवकाला वाचविण्यासाठी पडद्यामागून काही शक्ती कामाला लागल्याचे स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रूग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणारा शिवसेना शिंदे गटाचा माजी नगरसेवक रमेश म्हात्रे अटक होताच आजारी पडला. ठाणे सिव्हिल रूग्णालयामध्ये दाखल झाला. त्याला कुठलाही आजार नसल्याचे लक्षात येताच त्याला डिस्चार्ज दिला जाणार होता. तो ऐनवेळी रद्द कसा झाला?

रमेश म्हात्रेंला वाचवतोय कोण, असे सवाल आता उपस्थित होत आहेत.सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी १२ वाजता नगरसेवक म्हात्रे याला ठाणे सिव्हिल रूग्णालयातून डिस्चार्ज देण्याचे निश्चित झाले होते. मात्र ऐनवेळी रूग्णालय प्रशासनाने निर्णय बदलला आणि डिस्चार्ज रद्द केला. सत्ताधारी पक्षातील या आरोपी नगरसेवकाला वाचविण्यासाठी पडद्यामागून काही शक्ती कामाला लागल्याचे स्पष्ट होते.

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर अटक होताच म्हात्रेने आजारपणाचे सोंग घेतले. स्थानिक दवाखान्यात दाखल होणे शक्य नसल्याचे दिसताच त्याला ठाणे सीव्‍हील रुग्णालयाच्या आयसीयू विभागात भरती करण्यात आले.

डॉक्टरांकडून म्हात्रेच्या आरोग्याबाबतचे कोणतेही ठोस वैद्यकिय प्रमाणपत्र देण्यास कमालीची टाळाटाळ आता केली जात आहे. जोपर्यंत अधिकृत वैद्यकिय अहवाल समोर येत नाही तोपर्यंत पोलिसांना पुढील कायदेशीर पावले उचलता येत नाहीत. त्यामुळे पोलीसही संभ्रमात आहेत.

मर्डर केसचा आरोपी रमेश म्हात्रेच्या दावणीला

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात घुसून २ डॉक्टर आणि परिचारिकांवर हल्ला करणाऱ्यात शिंदे शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्यासोबत रमेश लक्ष्मण पवार हा ५० वर्षीय साथीदारही सहभागी होता. रमेश पवार हा डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील वडारवाडी परिसरात राहत असून एका खूनप्रकरणातला आरोपी आहे. तो रमेश म्हात्रेच्या दावणीला गेल्या काही वर्षांपासून असल्चाचे सांगितले जाते. पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या तो विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या कोठडीत आहे. हाच रमेश पवार केडीएमसीचा ठेकेदार असल्याची माहितीही उजेडात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT