Raj Thackeray pudhari photo
ठाणे

Raj Thackeray : सार्वत्रिक निवडणुकीत गाफील राहू नका

मतदार याद्यांचा अभ्यास करा- राज ठाकरे

पुढारी वृत्तसेवा

अंबरनाथ : आगामी सार्वत्रिक निवडणुकीत गाफील राहू नका. मतदार याद्यांचा अभ्यास करा. असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ येथे कार्यकर्त्यांना केले. यावेळी अंबरनाथ शहराची नवी कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर विद्यार्थी सेनेच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मागील महिन्यात मनसेच्या चार माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अंबरनाथमधील मनसेला धक्का बसला होता. त्यानंतर पदाधिकारी मेळावा तसेच जिल्हा विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाच्या उदघाटनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अंबरनाथ शहराचा दौरा केला. यावेळी येथील पनवेलकर सभागृहात राज ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. यावेळी पदाधिकार्‍यांचे मोबाईल जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांना मतदार याद्यांवर काम करण्याचा मोलाचा सल्ला दिला. आतापासूनच मतदार याद्यांवर काम सुरू करा. कोणते मतदार बोगस आहेत. वगळलेली आणि समाविष्ट केलेली नावे यांची माहिती ठेवा. याद्या तपासा, बीएलओंशी संवाद ठेवा, असा सल्ला यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांना दिला. जे सोडून गेले ते आपले नव्हते, असेही राज ठाकरे यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. त्यामुळे नव्या उत्साहाने कामाला लागा, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

यावेळी अंबरनाथ शहराची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत अनेक नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली असून शहर संघटक, उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष अशा अनेक नियुक्त्या या नव्या कार्यकारणीत करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT