ठाणे रेल्वे स्थानक pudhari file photo
ठाणे

Railway News | ठाणे स्थानकात उद्या रात्री सहा तासांचा पॉवर ब्लॉक

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकात शनिवार, दि. 21 सप्टेंबर रोजी रात्री साडे दहापासून रविवार 22 सप्टेंबरच्या पहाटे साडे चार वाजेपर्यंत पादचारी पूल गर्डर बसवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक रेल्वेने घोषित केला आहे.

ब्लॉक दरम्यान सहाव्या मार्गावर चालणार्‍या मेल व एक्स्प्रेस गाड्या कल्याण-दिवा ते मुलुंड-विद्याविहार स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यकता नसल्यास रेल्वेने प्रवास करणे टाळावे व सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात ठाणे पूर्व येथील चेंदणी बंदर ते ठाणे पश्चिम यांना जोडणार्‍या पुलाचे गर्डर बसविण्याचे काम मध्ये रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान सुटणार्‍या उपनगरीय सेवा आणि ठाणेकरिता वाशी येथून 21.37 ते पनवेल येथून 23.18 वाजेपर्यंत जाणार्‍या उपनगरीय सेवा रद्द राहतील.

डाऊन ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ठाणे येथून 21.41 वाजता सुटेल व वाशी येथे 22.10 वाजता पोहोचेल. अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशी येथून 21.24 वाजता सुटेल व ठाणे येथे 21.53 वाजता पोहोचेल. डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाणे येथून 5.12 वाजता सुटेल व पनवेल येथे 6.04 वाजता पोहोचेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT