डोंबिवली : रेबीजच्या प्रादुर्भावामुळे मानवी मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत डोंबिवलीच्या पॉज संस्थेसह लंडनमधील वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिसेसकडून भटक्या श्वानांना मोफत अँटीरेबीज लसीकरण केले. जवळपास 140 भटक्या जनावरांना अँटी रेबीजची लस देण्यात आली. डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये ही मोहिम शुक्रवारी (दि.20) दिवसभरात राबवण्यात आल्याचे पॉज संस्थेचे संस्थापक डॉ. निलेश भणगे यांनी सांगितले.
कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील महागणपतीच्या टिटवाळ्यातील रिजन्सी सर्वम् गृहसंकुलाच्या परिसरात शुक्रवारी 6 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात साठ वर्षांची वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. ही घटना ताजी असतानाच कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बेतूरकरपाड्यातल्या शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या अथर्व श्रीवास या आठ वर्षीय मुलाच्या तोंडाला आणि गुप्तांगाला चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. कल्याण पश्चिमेकडे बेतुरकरपाड्यातल्या गोल्डन पार्क गृहसंकुलात राहणारा शुभम चौधरी (27) याचा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर आठवडाभरापूर्वी मांजर चावल्याने मृत्यू झाला. नरभक्षी कुत्र्यांच्या दहशतीमुळे अबाल-वृद्धांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
शहरांसह ग्रामीण परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यांना रेबीजची लागण होण्याची शक्यता आहे. याचा मानवी आरोग्यालाही धोका संभवतो. पॉजतर्फे दरवर्षी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेबीज लसीकरण मोहीम घेतली जाते. ठाणे शहरासह उपनगरांत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. रेबीज झालेला कुत्रा माणसाला चावल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे शहरी कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्याचा उपक्रम पॉजने मागील एकवीस वर्षांपासून सुरू केला आहे. विविध पालिकांकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. त्याचवेळी त्यांचे लसीकरण करण्यात येते. मात्र भटक्या कुत्र्यांचे लसीकरणच होत नसल्याने त्यांच्यासह परिसरातील सर्वसामान्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळेच रेबीज विरोधी मोहीम हाती घेण्यात आल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील महागणपतीच्या टिटवाळ्यातील रिजन्सी सर्वम् गृहसंकुलाच्या परिसरात शुक्रवारी, दि. 6 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात साठ वर्षांची वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. ही घटना ताजी असतानाच कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बेतूरकरपाड्यातल्या शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या अथर्व श्रीवास या आठ वर्षीय मुलाच्या तोंडाला आणि गुप्तांगाला चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. कल्याण पश्चिमेकडे बेतुरकरपाड्यातल्या गोल्डन पार्क गृहसंकुलात राहणारा शुभम चौधरी (27) याचा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर आठवडाभरापूर्वी मांजर चावल्याने मृत्यू झाला. नरभक्षी कुत्र्यांच्या दहशतीमुळे अबाल-वृद्धांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.