Kulgaon Badlapur Municipal Council Pudhari
ठाणे

KBMC News | कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी प्रविण राऊत यांची वर्णी

BJP Pravin Raut | नगराध्यक्षा रुचिता घोरपडे व उपनगराध्यक्षा प्रियंका दामले, भाजप, राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

Kulgaon Badlapur Municipal Council

बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपचे प्रविण राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे व उपनगराध्यक्षा प्रियंका दामले, भाजप, राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. यावेळी राऊत यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढून जल्लोष केला.

प्रवीण राऊत हे गेली अनेक वर्ष शिवसेनेचे काम करत होते. मात्र सर्वसाधारण निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर स्वीकृत सदस्य पदी त्यांची निवड होईल अशी अपेक्षा होती. मात्र, नगरसेवक पदी निवड न झाल्याने त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना भाजपाने स्वीकृत सदस्य पदासाठी नियुक्त केले.

बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत त्यांची या नगरसेवक पदी वर्णी लागली. बहुजन युवा नेतृत्व अशी राऊत यांची ठाणे जिल्ह्यात एक वेगळी ओळख आहे. बहुजन समाजातील तरुणांसाठी ते विशेष कार्य करत असतात. इतकाच नाही तर त्यांचा शिरगाव आणि परिसरात प्रबल्य असून त्यांच्या पत्नी शितल राऊत आणि वहिनी विजया राऊत या परिसरातून नगरसेविका म्हणून निवडूनही आल्या आहेत.

बदलापुरात "भिम महोत्सवाचे" आयोजन ते गेले अनेक वर्ष करत असून या माध्यमातून बहुजन समाजातील तरुणांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम ते करत आले आहेत. त्यांची स्वीकृत सदस्य पदी निवड झाल्याने त्यांच्या राजकीय अनुभवाचा भारतीय जनता पक्षाला फायदा होईल, असे भाजप गटनेते शरद तेली यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT