Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाचे पडसाद कल्याण-डोंबिवलीत, शेकडो भूमिपुत्रांचा कॅण्डल मार्च! 
ठाणे

Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाचे पडसाद कल्याण-डोंबिवलीत, शेकडो भूमिपुत्रांचा कॅण्डल मार्च!

आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : प्रदीप पूर्णेकर हत्याकांडानंतर ठाणे जिल्ह्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून या घटनेचे पडसाद आता कल्याण-डोंबिवलीतही उमटू लागले आहेत. स्थानिक भूमिपुत्रांनी आक्रमक पवित्रा घेत अटक आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करा, अशी मागणी करत ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळील इंदिरा गांधी चौकापर्यंत कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

  या कॅण्डल मार्चमध्ये राम पूर्णेकर यांच्यासह स्थानिक आगरी-कोळी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अटक आरोपींना फाशी द्या आणि मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करा, अशी जोरदार मागणी केली.

यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राम पूर्णेकर यांनी आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, मुख्य सूत्रधार असलेल्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती या दोघांनाही तत्काळ अटक झाली पाहिजे, असे सांगितले. तसेच १९ तारखेला या मागणीसाठी साखळी उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आजपर्यंत पोलिसांना अनेक पुरावे दिले, त्याचा काही उपयोग झाला नाही. आता पुरावे थेट न्यायालयासमोर सादर करणार असल्याचेही राम पूर्णेकर यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT