Pradeep Purnekar Case pudhari photo
ठाणे

Thane Ram Purnekar to submit new evidence list | राम पूर्णेकरांच्या हाती नवा पुरावा ?

नव्या पुराव्यासह आतापर्यंत दिलेली पुराव्यांची यादी सादर करणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

स्व. प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येला तब्बल ५० दिवस उलटले आहेत. मात्र राम पूर्णेकर यांच्या कुटुंबियांना न्याय मिळताना दिसत नाही. तर दिलेल्या पुराव्यानंतरही ठोस कारवाई होताना दिसत नसल्याची खंत राम पूर्णेकर, यांनी व्यक्त केलेली आहे. तर लवकरच पत्रकार परिषद घेऊन हाती लागलेला नवा पुरावा पत्रकार परिषदेत सादर करणार असल्याचे राम पूर्णेकर याने सांगितल्याने आता राम पूर्णेकर यांच्या हाताला कुठला नवा पुरावा लागलेला आहे. याबाबत चर्चेला उधाण आलेले आहे.

प्रदीप पूर्णेकर हत्या

स्व. पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर हा हत्येपासून या प्रकरणाशी संबंधित मिळालेले पुरावे ठाणे पोलिसांना देत आहे. मात्र पोलीस आणि एसआयटी टीम हि पुरावे घेऊन त्याची फॉरेन्सिक लॅब तपासणी आवाहल आर्दीच्या सबबी सांगत कारवाईला ब्रेक लावण्याचा प्रकार करीत असल्याचा दावा राम पूर्णेकर याने केला.

तर आता पत्रकार परिषद घेऊन नव्या पुराव्यासह आतापर्यंत पोलिसांना दिलेल्या पुराव्याची यादीच प्रसार माध्यमांसमोर सादर करणार असल्याचे राम पूर्णेकर याने सांगितले. पोलिसांना आणि एसआयटी पथकाला राम पूर्णेकर यांनी फोटो आणि व्हिडिओ दिले तरीही कुठलीच कारवाई होत नसल्याने आता हत्या प्रकरणाचे आरोपपत्र पोलिसांद्वारे न्यायालयात सादर करण्याची वाट पाहत आहोत. पोलिसांनी आरोपपत्रात काय नमूद केलेले आहे हे कळल्यानंतर पुढील लढाई सुरु करणार असलयाचे स्पष्ट केले.

राम पूर्णेकर यांच्या हाताला कुठला नवा पुरावा लागला?

ठाणे एसआयटी पथकाला यापूर्वीच अनेक फोटो व्हिडीओ पोलिसांना सादर केलेले आहेत. मात्र अद्याप पूर्णेकर कुटुंबियांच्या मागण्यांचा आणि कारवाईचा विचार झालेला नाही. गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राम पूर्णेकर याना नव्या पुराव्याबाबत विचारले असता त्याने हा नवा पुरावा हाती लागलेला असल्याचे सांगितले. मात्र हा पुरावा आणि यापूर्वी दिलेले पुरावे हे पत्रकार परिषदेत सादर करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान ठाण्यात विविध चर्चाना पेव फुटलेले असून राम पूर्णेकरांच्या हाती कुठला नवीन पुरावा लागला आहे. दरम्यान स्थानिकांच्या आणि पूर्णेकर निकटवर्तीयांच्या माध्यमातून राम पूर्णेकर याच्या हाताला हत्या संदर्भात संवादाची ऑडिओ क्लिप लागलेली आहे. सदर क्लिप पोलिसांना देणार का? असे विचारताच नाही ही ऑडिओ क्लिप आणि या अगोदरचे पुरावे पत्रकार परिषदेत सादर करणार असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT