वासिंद पोलीस ठाणे
वासिंद पोलीस ठाणे  file photo
ठाणे

Thane | पोलीस ठाण्याच्या छपराला गळती, वासिंदमध्ये नवीन इमारतीची निकड

पुढारी वृत्तसेवा

वासिंद : पावसाळा सुरू झाला असून वासिंद पोलीस ठाण्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. २०१५ पूर्वीच्या असलेल्या दुरक्षेत्रातील चौकीतून सध्याच्या पोलीस स्टेशनचा कार्यभार सुरु आहे. या ठिकाणच्या ३ ते ४ खोल्यामध्ये गेल्या ९ वर्षांपासून पोलीस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करून काम करावे लागत आहे. आता तर चक्क या पोलीस ठाण्याच्या छपराला गळती लागल्याने त्या छपरावर ताडपत्रीचा वापर करून वासिंद पोलीस ठाण्याचा कार्यभार सुरु असल्याचे विदारक चित्र आज पाहावयास मिळत आहे. शासनाच्या एक एकर जागेवर मंजूर झालेली पोलीस ठाण्याची इमारत कधी पूर्ण होईल याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

शहापूर तालुक्यातील वासिंद गावांनी गाव पण सोडून शहरी रूप धारण केलेले आहे सर्व सुख सोयीमुळे वासिंद शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता या शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी येथे असणाऱ्या पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी हे खडतर मेहनत घेत आहेत परंतु येथील पोलीस स्टेशनची दयनीय अवस्था झाल्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करून आपला कारभार करावा लागत आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षापासून वासिंदच्या जेएसडब्ल्यू कंपनीकडून पोलीस स्टेशनची नवीन इमारत होण्यासाठी सर्व प्रकारचा पाठपुरावा करून व सर्व परवानग्या तत्कालीन वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या आहेत तसेच पोलीस स्टेशन इमारतीच्या कामांची संबंधित कॉन्ट्रॅक्टरला कंपनीकडून मंजूर होऊनही काम सुरू होत नाही ही मोठी शोकांतिका आहे

पोलीस कल्याण निधीतून व सीएसआर फंडातून अंदाजे तीन कोटी ९५ लाख रुपयाचे काम मंजूर होऊन कंपनीने संबंधित कॉन्ट्रॅक्टदार यांना पैसेही अदा केले असल्याचे समजते जिल्हा प्रशासन, नगर रचना विभाग व तत्कालीन पोलीस महासंचालक कार्यालय व पोलीस अधीक्षक यांच्याकडून संपूर्ण सोपस्कार पूर्ण होऊनही पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम का सुरू होत नाही हा प्रश्न सर्वसामान्यांना नागरिकांना पडला आहे तरी याबाबत वासिंद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांना याबाबत विचारले असता कोणतेही ठोस कारण व उत्तर देण्यास त्यांच्याकडून विचारले असता कोणतेही ठोस कारण व उत्तर देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे

वासिंद येथील एक खाजगी कंपनीने आपल्या सी एस आर फंडातून पोलीस स्टेशनची भव्य इमारत बांधून देत असतानाही केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे सदरचे काम रद्द होण्याच्या मार्गावर आहे. असे दिसून येते त्यामुळे कंत्राटदाराला दिलेल्या मुदतीत त्यांनी काम केले नाही. तर त्यास दंड ठोठावला जातो यामुळे कॉन्ट्रॅक्टर हतबल झाला असून या कामाच्या परवानगीसाठी आताच्या वरिष्ठांकडून कोणतेही लेखी आदेश प्राप्त होत नाहीत तोपर्यंत काम सुरू होणार नाही. अन्यथा हे काम रद्द होईल अशी शंका निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. तरी याबाबत येथील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, गृहमंत्री व मुख्यमंत्री आदी संबधीत प्रशासनाने लक्ष घालून या इमारतीचे बांधकाम कसे पूर्ण करता येईल याचे आदेश देऊन वासिंद पोलीस स्टेशनची भव्य इमारत कशी होईल याकडे लक्ष घालावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

SCROLL FOR NEXT